महाराष्ट्र

एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार!

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बूस्ट मिळाला होता. सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुरती दाणादाण उडाली. सहानुभूतीची मते ठाकरेंना मिळाली नाहीत. कशातरी 20 जागा निवडून आल्या.

महाविकास आघाडीच्या सगळ्याच डावपेचांवर भाजपची रणनीती सरस ठरली. आता दुसरीकडे राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा हळूहळू सुटताना दिसत आहे. मुख्यमंत्रि‍पदावर महायुतीत जो तणाव निर्माण झाला होता, आता तोही निवळू लागला आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मुंबईत नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मात्र त्याआधीच मोठी बातमी हाती आली आहे. यानुसार एकनाथ शिंदे या शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हे आता निश्चित झाले आहे.

दरम्यान, शिंदे काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. याआधीच्या सरकारमध्ये ज्या नेत्यांना मंत्रिपद दिले होते, अशा तीन नेत्यांना यावेळी मंत्रिपद दिले जाणार नाही. म्हणजेच मंत्री राहिलेल्या तीन बड्या नेत्यांचा पत्ता कट होणार आहे. त्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. अकार्यक्षम, भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाचाळवीर मंत्र्यांना शिंदे नारळ देण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button