महाराष्ट्र

बिग ब्रेकिंग! राज्यात थंडी आणखी वाढली

राज्यातील किमान तापमानामध्ये घट होताना दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्रानंतर आता मुंबईत देखील थंडीत वाढ होताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. पहाटे आणि रात्री हवेमध्ये मोठ्या प्रमाणात गारवा जाणवू लागला आहे. अशातच हवामान खात्याने वातावरणात आणखी बदल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिमाण महाराष्ट्रातील हवामानावर होणार आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात मोठे बदल होणार आहे. त्यामुळे तापमानात मोठी घट देखील होणार आहे.

महाराष्ट्रात दिवसाला तापमानात वाढ तर पहाटे आणि रात्री तापमानात कमी होण्याची शक्यता आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर देशातील इतर राज्यातील तापमानात देखील घट होण्याची शक्यता आहे. हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे मुंबईकरांसह ठाणे आणि नवी मुंबईतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याठिकाणी तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचसोबत पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे याठिकाणी थंडीचे प्रमाण वाढले आहे.

Related Articles

Back to top button