वाल्मिक कराड अन् ‘आकां’मध्ये द्वंदयुद्ध

पोलिसांसमोर हजर व्हायचे की नाही, यावरुन वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकांमध्ये द्वंदयुद्ध सुरु असल्याचा नवा बॉम्ब भाजपचे आमदार सुरेश धसयांनी फोडला आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धस यांच्याकडून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय कराड यांच्यावर गंभीर करण्यात येत आहेत. याप्रकरणी धस यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
धस पुढे बोलताना म्हणाले, कराडच्या अटकेच्या मुद्द्यावरुन आज सकाळीच माझ्याकडे काही माध्यमांची प्रतिनिधी आले होते. त्यावेळी मी सांगितले की मी सर्वच माध्यमांच्या समोर बोलणार आहे. जोपर्यंत सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून अधिकृतपणे कराडला अटक झाली की हे सांगितले जात नाही, तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही. पोलिसांसमोर हजर व्हायचे की नाही यावरुन कराड आणि त्यांच्या आकांमध्ये द्वंदयुद्ध सुरु असल्याचा दावा धस यांनी केला आहे.



