बिजनेस

ब्रेकिंग! नवीन वर्षात पहिल्याच दिवशी बँकाच्या नियमात बदल

  • भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) नियमांमध्ये वेळोवेळी बदल करत असते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून अर्थात एक जानेवारी 2025 पासून आरबीआयने काही प्रकारची बँक खाती बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. आरबीआयच्या नव्या नियमांनुसार काही प्रकारांमध्ये तुमचे खाते असेल तर ते बंद होऊ शकते.
  • डोरमेंट अकाऊंट म्हणजे असे खाते ज्यामध्ये दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून कोणतेही व्यवहार झालेले नाही. अशा अस्थायी स्वरुपात बंद असलेल्या अकाऊंटचा वापर हॅकर्स प्रामुख्याने करतात. अशी खाती त्यांच्यासाठी पर्वणीच असते. अशा बँक अकाऊंट्सचा वापर करुन हॅकर्स बँक खातेधारकांची फसवणूक करतात किंवा बँकाचीही फसवणूक करतात. त्यामुळे अशी खाती बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे.
  • तसेच अनेक खात्यांमध्ये गेल्या काही काळापासून झिरो बॅलेन्स आहे, एक रुपयाही खात्यामध्ये जमा केला गेलेला नाही. अशा शून्य बचत असलेल्या खात्यांवरही आरबीआयने गंडांतर आणण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या विविध योजनांसाठी लाभार्थींकडून झिरो बॅलेन्स खाते उघडले जातात. या खात्यांवर नंतर व्यवहार होत नाही. खात्यांवर शून्य बॅलेन्स असते.
  • अशा खात्यांच्या माध्यमातून ग्राहक आणि बँकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. ग्राहक आणि बँकांची फसवणूक टाळण्यासाठी, आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी, डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी तसेच केवायसी मजबूत करण्यात यावी, ग्राहकांची ओळख आणि नियमांचे पालन योग्य पद्धतीने होणे, हे सर्व सुस्थितीत ठेवण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.

Related Articles

Back to top button