महाराष्ट्र
ब्रेकिंग! सोशल मीडियावर भाईगिरी करणारे फोटो दिसल्यास बसेल जबर दणका

सध्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान कोणी अवैध शस्त्राचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. त्यांना अटक करण्यात येईल.
तरुणाईमध्ये सोशल मीडियाची चांगलीच क्रेझ आहे. लाईक अन् कमेंट किती आल्या त्यावरुन आपण किती प्रसिद्ध आहोत, हे काही तरुण ठरवत असतात. मग त्यासाठी भाईगिरी करणारे फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करत असतात. परंतु आता असे फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करणे चांगलेच महागात पडणार आहे. यासंदर्भात पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर भाईगिरी करणारे फोटो दिसल्यास कारवाई होणार आहे.