क्राईम
ब्रेकिंग! खबरदार..! जर कुणी पिस्तूल घेऊन…

- सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता सीआयडी आणि पोलिस हे दोघेही अँक्शन मोडमध्ये आले आहेत. बीडचे नवे पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी आज प्रसार माध्यमांसमोर त्यांच्या नव्या योजनेविषयी सांगून टाकले.
- सिंघम अधिकारी अशी ओळख असलेल्या काँवत यांनी बीडच्या तरुणांना दिलेल्या धमकीवजा इशाऱ्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. काँवत यांच्या या इशाऱ्यामुळे बीडमध्ये लवकरच शांतता प्रस्तापित होईल, असे बोलले जात आहे.
- काँवत यांनी आज बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. ही भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, बीड जिल्ह्यात कुणाला शस्त्र परवाने दिले आहेत, त्या सर्वांची चौकशी सुरु आहे. शस्त्र परवाना असणार्या किती जणांवर गुन्हे दाखल आहेत आणि ते गुन्हे कोणत्या प्रकारातील आहेत, याची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. आता कुणाचे शस्त्र परवाने ठेवायचे व कुणाचे शस्त्र परवाने काढून घ्यायचे, याचे अँनलिसीस सुरु आहे. लवकरच ज्यांना गरज आहे, फक्त तेवढेच शस्त्र बीड जिल्ह्यात दिसतील, असा विश्वास काँवत यांनी व्यक्त केला.



