राजकीय

ब्रेकिंग! तुम्ही कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा या भूमिकेवर आजही ठाम

  • विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात उद्या मतदान होत आहे. काल रात्री प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक त्यांनी माघार घेतली. अशातच आता एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून समोर आलेली आहे. काही तरूण गावोगावी फिरत असून आम्हाला जरांगे पाटलांनी पाठवले आहे, त्यांचा आदेश आला आहे की, ‘या’च उमेदवाराला मतदान करा. यावर आता जरांगे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. अशा कोणत्याच तरूणांना मी पाठवलेले नाही, असे जरांगे यांनी सांगितले.
  • जरांगे म्हणाले की, काहीजण माझ्याजवळ येवून बसतात. माझ्यासोबत फोटो काढतात. त्यानंतर आपापल्या मतदारसंघात जावून सांगतात की, आदेश आला आहे याला पाडा, त्याला पाडा वैगेरे. हे सगळं खोटं आहे. मी माझ्या मायबाप मराठ्यांना सरळ सांगतो की, संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या वैयक्तिक भूमिकेवर काम करत आहे. ज्याला पाडायचे त्याला पाडत आहेत, ज्याला निवडून आणायचे त्याला आणत आहेत. त्यांना कोणाला तरी मतदान करावे लागणार आहे, तुम्ही कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा या भूमिकेवर मी आजही ठाम आहे, असे जरांगे म्हणाले.

Related Articles

Back to top button