राजकीय

ब्रेकिंग! हनी ट्रॅपमुळे शिंदेंचे सरकार आले

  • एकनाथ शिंदे यांचे सरकार कशा पद्धतीने आले, याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. हनी ट्रॅपच्या माध्यमातूनच एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाले, असा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
  • विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनी ट्रॅपचे आरोप फेटाळून लावले. पण सरकार आणि विरोधकांकडे याविषयी माहिती आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काल हनी नाही आणि ट्रॅपही नाही, असे फडणवीस म्हणाले होते. पण याबाबत मोठी माहिती सरकार आणि विरोधकांकडे आहे, असेही ते म्हणाले होते.
  • कुणाच्या पर्सनल आयुष्यात डोकावण्याचा अधिकार कुणालाही नाही. पण शिंदेंचे जे सरकार आले, जी काही सत्तापालट झाली, ती सीडीमुळे झाली. एवढं मोठं ते प्रकरण आहे, असे वडेट्टीवार म्हणाले आहेत. जे काही अधिकारी आहेत. आजी – माजी मंत्री आहेत. यात खूप बड्या व्यक्तींचा समावेश आहे. यावर अधिक बोलण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
  • जेव्हा दाखवू तेव्हा तिकीटच लावावे लागेल. तिकीट लावूनच चित्र दाखवावे लागेल, असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत. वडेट्टीवारांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, काँग्रेसचेच नेते नाना पटोले यांनी काल विधानसभेत हनी ट्र्रॅपचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी तसे काही घडले नसल्याचे सांगितले होते.

Related Articles

Back to top button