गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर गलिच्छ टीका

Admin
2 Min Read
  • भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दांत टीका केली. या टीकेचे पडसाद तीव्र पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्यांनी नोंदविला असून आता या प्रकरणी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आहे.
  • पडळकरांनी केलेल्या टीकेबद्दल पवारांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आहे. अशी टीका करणे योग्य नाही, बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा, असे फोनवरून पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना म्हटले असल्याची माहिती मिळत आहे. पाटील यांच्यावर आणि त्यांच्या वडिलांबाबत अत्यंत हीन पद्धतीने केलेल्या विधानावर पडळकर हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
  • माणसं पाठवली. कशासाठी? पडळकरने कुठल्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का? घ्या एखादा मधला व्यापारी घ्या आणि त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा. अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलाद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. एवढ्या खालच्या लेव्हलला? आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे. ये बघायला.
  • तुझे डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून, असे म्हणत पडळकरांनी पाटील यांचा एकेरी उल्लेख केला. याशिवाय जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची अवलाद वाटत नाही, काही तरी गडबड आहे का? अशी अत्यंत खालच्या शब्दांत टीका पडळकरांनी केली. यामुळे आता ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यामुळे आता या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Share This Article