देश - विदेश

जय हिंद! भारताने सांगून केला स्ट्राईक

  • भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची नऊ तळ उद्धवस्त केली आहेत. या हल्ल्यामुळे भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यामुळे पहलगाम हल्ल्यात मृत झालेल्यांचे कुटुंबिय आता देशाला थँक्स म्हणत आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानवर हल्ला पुर्वनियोजित कसा होता हे आता उघड झाले आहे.
  • भारतीय सैन्याने सहा मे रोजी उशिरा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने राबवलेल्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्ताननेही राफेल पाडल्याचा फेक दावा केला आहे. अशातच आता हल्ल्यापूर्वी भारतीय लष्कराने सोशल मीडियावर पोस्ट करुन गुप्त संदेश दिला होता, त्यानंतर हा हल्ला केला.
  • भारतीय लष्कराने त्यांच्या अधिकृत हँडल @ADG PI-INDIAN ARMY वरून मध्यरात्री 1.28 वाजता एक पोस्ट केली ज्यामध्ये लिहिले होते की, “प्रहार करण्यासाठी तयार, जिंकण्यासाठी प्रशिक्षित” हे संस्कृतमध्ये देखील लिहिले आहे, “प्रहारय सन्निहितह, जयया प्रक्षितः” म्हणजे “विजयासाठी आक्रमण करण्यास सज्ज”. 

Related Articles

Back to top button