क्राईम

राज्यात मोठी खळबळ

  • 23 वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करुन निर्घृण खून केल्याची भयंकर घटना बारामतीमध्ये घडली आहे. सहा महिन्यातील तिसरी खूनाची घटना समोर आल्याने बारामती शहर हादरुन गेले आहे. या हत्येप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
  • याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद कॉलेज रस्त्यावर काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास 23 वर्षीय युवकाचा कोयत्याने निघृण वार करत खून करण्यात आला. या प्रकरणाने बारामती हादरली आहे. गेल्या सहा महिन्यातील हा तिसरा खुनाचा प्रकार आहे.
  • काल रात्री साडेदहाच्या सुमारास प्रगतीनगर परिसरातील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद कॉलेज रस्त्यावर अनिकेत सदाशिव गजाकस या युवकावर कोयत्याने वार करण्यात आला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने अनिकेत याचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, अनिकेत हा मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी अभिषेक सदाशिव गजाकस यांच्या फिर्यादीवरुन बारामती शहर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक गजानन ठेके करत आहेत.

Related Articles

Back to top button