क्राईम

ब्रेकिंग! कुख्यात गुंड हाजी सरवर याच्यावर गोळीबार

राज्यात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान दीड महिन्यांपासून चंद्रपूरमध्ये गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. आज कुख्यात गुंड हाजी सरवर याच्यावर शहरातील बिनबा गेट परिसरातील शाही दरबार हॉटेलमध्ये अज्ञातांनी गोळीबार केला. गोळीबारासह चाकूच्या मारामारीत हाजी सरवर गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
चंद्रपूर जिल्ह्यात हाजी आणि इतर गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे हा गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. तसेच घटनेचा पुढील तापस सुरू केला आहे.

Related Articles

Back to top button