राजकीय

ब्रेकिंग! महाविकास आघाडीला झटका?

  • महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून राजकीय पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर केल्या जात आहेत. महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. 
  • शेतकरी कामगार पक्षाकडून अलिबागमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शेकाप नेते जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची घोषणा केली आहे. 
  • पाटील यांच्याकडून आतापर्यंत एकूण 6 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. सांगोला मतदारसंघासाठी देखील शेकापकडून उमेदावाराची घोषणा करण्यात आली आहे. शेकापकडून सांगोला मतदारसंघासाठी डॉ. बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सांगोल्यातील माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने मविआत उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. ठाकरे गट दीपक साळुंखे यांना उमेदवारी देऊ इच्छुक आहे. तर शेकापदेखील या जागेसाठी आग्रही आहे. तसेच शेकापने बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारी या मतदारसंघातून जाहीर केली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.
  • उरणमधून प्रीतम म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पनवेलमधून माजी आमदार बाळाराम पाटील लढणार आहेत. तर, अलिबागमधून शेकापच्या महिला आघाडी प्रमुख आणि जयंत पाटील यांच्या स्नुशा चित्रलेखा पाटील यांनी उमेदवारी मिळाली आहे. 

Related Articles

Back to top button