क्राईम
मुंबई पोलिसांकडून मोठ्या xxx रॅकेटचा पर्दाफाश

- मुंबई पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईमध्ये एका हॉटेलमधून चार महिलांचीही सुटका करण्यात आली असून एका दलालालाही अटक करण्यात आली आहे.
- मुंबई पोलिसांनी काल शहरातील पवई परिसरात एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आणि एका हॉटेलमधून चार महिलांची सुटका केली. एका गुप्त माहितीच्या आधारे पवई पोलिसांनी ही कारवाई केली.
- दरम्यान अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोपनीय माहिती मिळाल्यानंतर हॉटेलमध्ये सापळा रचला आणि महिलांना वेश्या व्यवसायात भाग पाडल्याच्या आरोपाखाली श्याम सुंदर अरोरा नावाच्या व्यक्तीला अटक केली. तसेच चार महिलांना वाचवले.
- पीडितांपैकी एकीने हिंदी टेलिव्हिजन मालिकांमध्येही काम केलं आहे. सध्या, आरोपी व्यक्ती आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध पवई पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.