हवामान

ब्रेकिंग! चक्रीवादळामुळे संपूर्ण राज्यात 21 ते 24 मे दरम्यान मुसळधार पाऊस!

अंदमान बेटांवर आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात मान्सूनचा प्रवेश झाला असून या प्रभावामुळे महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ५० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. 

हवामान विभागाने चक्रीवादळामुळे संपूर्ण राज्यात 21 ते 24 मे 2025 दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यत वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने केले आहे.

पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, धुळे, नाशिक तसेच त्यांच्या आसपासच्या घाट भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ५०-६० किमी वेगाने वाऱ्याचे तुफान यावेळी अपेक्षित आहे. यामुळे या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, जे पूर्णपणे लक्षात घेणे आवश्यक आहे. या भागात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान होण्याचीही शक्यता असते, त्यामुळे लोकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

Related Articles

Back to top button