सोलापूर

सुखद धक्का! सोलापूरकरांना खुशखबर

सोलापूर : नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी कोणतीही घटना घडल्यास पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचावेत, यासाठी सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाची डायल-112 ही यंत्रणा नोव्हेंबर महिन्यात राज्यात अव्वल ठरली आहे.

दरम्यान, आपत्कालीन प्रतिसाद पथक (डायल-112) सोलापूर शहर यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता, राजकीय सभा, कायदा व सुव्यवस्थेचा महत्त्वाचा बंदोबस्त, पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच झेड प्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तींचे महत्त्वाचे बंदोबस्त अशा अनेक पातळीवर मात करीत एक ते 30 नोव्हेंबरपर्यंत एकूण एक हजार 707 नागरिकांकडून डायल 112 या हेल्पलाइनवर पोलिस मदत मागितली, त्यांना पोलिस आयुक्तालाच्या डायल-112 पथकाने कमीत कमी वेळेत सरासरी 37 सेकंदांमध्ये प्रतिसाद देत मदत दिली.

संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी सोलापूर शहर पोलिसांची यंत्रणा डायल-112 ही यंत्रणा राज्यात नोव्हेंबर महिन्यात अव्वल आली. नियंत्रण कक्षामध्ये डिस्पॅचर यंत्रणा स्वतंत्रपणे उभारण्यात आली आहे. त्यासाठी प्रशिक्षित पोलिस अधिकारी व अंमलदार तसेच तांत्रिक सहाय्यकरिता तंत्रज्ञानाची नेमणूक करण्यात आली आहे. 

सर्वसामान्य नागरिकांनी पोलिस मदतीसाठी डायल-112 वर केलेल्या कॉलला नव्या व आधुनिक सुविधेमुळे अतिशय कमी वेळात पोलिस मदत मिळविण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यानुसार नोव्हेंबर 2024 मध्ये सोलापूर शहर पोलिस आयुक्तालय संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नागरिकांना पोलिस प्रतिसाद मदत पोहोचवण्यात प्रथम क्रमांकावर आले आहे. नागरिकांना पोलीस मदत पोचविण्याचा सरासरी वेळ 37 सेकंद असा आला आहे.

पोलिस आयुक्त सोलापूर शहर यांनी कमीत-कमी वेळात नागरिकांना पोलिसांचा दर्जेदार प्रतिसाद मिळेल या दृष्टीने मार्गदर्शन केले. यामध्ये सर्व बीट मार्शल व पीसीआर वाहनांवरील स्टाफ यांना समुपदेशन करून नागरिकांच्या प्रती संवेदनशीलता वाढविण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण दिले गेले आहे. पोलिस आयुक्तालयातील डायल-112 घटकातील सर्व पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांचे पोलिस आयुक्त एम.राजकुमार, पोलिस उपायुक्त अजित बोर्‍हाडे यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button