महाराष्ट्र
खोटी माहिती देणाऱ्या बहिणींना झटका! घरोघरी जाऊन पडताळणी होणार
- महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री अदिती तटकरे यांनी सरसकट पडताळणी करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असे सांगितले होते. परंतु आता या योजनेची लाभार्थी असलेल्या प्रत्येक महिलेच्या घरी जाऊन पडताळणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या योजनेचा लाभ घेतलेल्या महिला अपात्र ठरल्या तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाण्याची देखील शक्यता आहे.
- ताज्या अपडेटनुसार लाडकी बहीन योजनेंतर्गत सर्वसमावेशक पडताळणी मोहिमेचा भाग म्हणून राज्याच्या महिला व बालविकास विभागाचे अधिकारी लाभार्थ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची उलट तपासणी करतील, लाभार्थ्यांच्या घरांना प्रत्यक्ष भेटी देतील आणि संपूर्ण डेटा मॅचिंग करतील. एवढंच नाही तर खोटे दावे दाखल करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा प्रस्ताव देखील महिला आणि बालविकास विभागाकडून देण्यात आला आहे.