महाराष्ट्र
ब्रेकिंग! ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात न जाण्याचा शरद पवारांचा निर्णय
- महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक खात्यांवरुन रस्सीखेच सुरु आहे. अशातच महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये हा अंतिम फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे.
- दरम्यान ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात न जाण्याचा निर्णय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने घेतला आहे. याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दिली आहे. ज्या उमेदवारांना वैयक्तिकपणे कोर्टात जायचे आहे, त्यांच्यासाठी मार्ग मोकळा असेल, असेही त्यांनी सांगितले.
- पुढील महापालिका आणि पक्ष संघटनेची रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची बैठक होणार आहे. सर्व पदाधिकारी आमदार आणि खासदार बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले.