महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव; तरीही काँग्रेस नेत्यांचे डोळे उघडेना

  1. विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर भाजपने मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकत पुन्हा देवेंद्र फडणवीसांकडे राज्याचे नेतृत्व सोपवले. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभात एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
  2. मात्र मंत्रिमंडळाचे खातेवाटप अद्याप झालेले नाही. शिंदे महत्वाच्या खात्यासाठी अडून बसलेले दिसून येत आहेत. यावरून महाविकास आघाडीतील नेते शिंदे सेना व अजितदादा गटावर टीका करत आहेत. आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत खोचक टोला लगावला आहे.
  3. महाराष्ट्रात अनपेक्षित यश मिळाले. सत्ता अमर्याद झाली आणि ती डोक्यात गेली. तसेच उपमुख्यमंत्री नंबर दोन वर कोण आणि नंबर तीनवर कोण, हे मुख्यमंत्री यांनी ठरवावे, असे वडेट्टीवार म्हणाले.
  4. जे काही होते ते ते पाहा, अशी स्थिती शिंदे आणि अजितदादा यांची झालेली आहे. जे जे देतील ते ते घ्या, जे जे मिळेल ते ते घ्या, नाही तर तुम्ही घरी आराम करा, असा खोचक टोला वडेट्टीवार यांनी लगावला. 

Related Articles

Back to top button