ब्रेकिंग! संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगवास

अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दोषी आढळले आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी राऊतांविरोधात खटला दाखल केला होता. कोर्टाने राऊतांना पंधरा दिवसांची कैद आणि 25 हजारांचा दंड ठोठावला आहे.
राऊतांविरोधात मेधा किरीट सोमय्या यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. यात राऊतांवर अनेक आरोप करण्यात आले होते. या प्रकरणावर गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरू होती. त्यावर आज अखेर कोर्टाने निकाल देत राऊतांनी दोषी ठरवले आहे. राऊत दोषी आढळल्याने कोर्टाने राऊतांना 15 दिवसांचा तुरूंगवास आणि 25 हजारांचा दंड ठोठावला आहे.
मेधा सोमय्या यांनी शौचालय घोटाळा केला आहे, असा आरोप राऊत यांनी केला होता. त्यानंतर या आरोपाचे पुरावे द्यावेत, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी राऊत यांना दिले होते. मात्र राऊत यांनी कोणतेही पुरावे न दिल्याने मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता.