क्राईम
ब्रेकिंग! देशात लवकरच बॉम्बस्फोट होणार?

- भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला असतानाच महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला स्फोटाच्या धमकीचा एक गुप्त ईमेल प्राप्त झाला आहे. या ईमेलमध्ये पुढील दोन दिवसांत मोठा स्फोट होण्याचा इशारा देण्यात आला असून पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलाबा येथील महाराष्ट्र राज्य पोलिस नियंत्रण कक्षाला हा ईमेल प्राप्त झाला.
- ईमेलमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की- कृपया आज, उद्या आणि परवा सावध राहा, एक मोठा स्फोट होणार आहे. तो कुठे आणि कधी होईल हे शोधायला वेळ मिळणार नाही. तो अगदी जवळच घडणार आहे. त्यामुळे कृपया ही शक्यता दुर्लक्षित करू नका.
- दरम्यान या इशाऱ्यामुळे पोलिस यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे. याप्रकरणी सायबर सेलसह विविध तपास यंत्रणा कार्यरत असून ईमेल पाठवणाऱ्याचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



