सोलापूर
प्रणिती शिंदेंचा भाजपवर खळबळजनक आरोप
- विधानसभा निवडणुकीनंतर चिंतन करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक काल काँग्रेस भवन येथे संपन्न झाली. यावेळी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले.
- यावेळी बोलताना खा. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, लोकसभेसारखा प्रतिसाद विधानसभा निवडणुकीत सुद्धा होता. अनेक सर्व्हेत राज्यात आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात काँग्रेस पुढे होती. पण भाजपने षडयंत्र आणि कपट नीतीने EVM मदतीने विजय मिळविला. भाजपच्या विजयी उमेदवारांना अनेक मतदारसंघात जवळपास समान मते आहेत. देशात, राज्यात लोक EVM मशीन वर शंका उपस्थित करत आहेत. दिल्लीमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत EVM मशीन वर चर्चा झाली EVM मशीन विरोधात आणि मतपत्रिकेवर निवडणुका घ्यावेत यासाठी न्यायालयीन लढा आणि रस्त्यावरची लढाई काँग्रेस पक्ष देशभरात सुरू करणार आहे. आगामी काळात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी पराभव विसरून मरगळ झटकुन कामाला लागा नव्या आणि जुन्यांना सोबत घेऊन आपल्याला ही लढाई हिमतीने लढायचे आहे. लोक आपल्यासोबत आहेत त्यामुळे घाबरून जायचे कारण नाही. आगामी निवडणुकीत नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचे सांगितले.
- पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाले की मी महाविकास आघाडीचे प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळेच प्रदेशच्या नेत्यांच्या आदेशामुळे दिलीपराव माने यांना AB फॉर्म देऊ शकले नाही. मला माझा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. या निवडणुकीत मतदान केलेल्या, सहकार्य केलेल्या, काँग्रेस पक्षासोबत राहिलेल्या, माझ्यासोबत राहिलेल्या सर्वांचे आभार.