महाराष्ट्र
ब्रेकिंग! लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट

- राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. आत्तापर्यंत या योजनेचे पाच हप्ते जमा झाले आहेत. मात्र आता डिसेंबर महिन्याचे पैेसे कधी जमा होणार याची सर्व महिलांना प्रतीक्षा आहे.
- अशातच आता ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्यावर आहे. त्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण लाडक्या बहीण योजनेत कर भरणाऱ्या महिलांचा अर्ज अपेक्षित नसल्याचे सरकारने सांगितले आहे. तसेच या योजनेसाठी जे निकष आधीचे आहेत, तेच निकष कायम राहणार आहेत.
- आता यासंदर्भांत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर ज्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांच्या वर आहे किंवा ज्या महिला कर भरतात मात्र तरी देखील त्यांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे, त्यांचे अर्ज बाद होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.