महाराष्ट्र

ब्रेकिंग! पाच डिसेंबरला फक्त तिघांचाच होणार शपथविधी

  • विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला असला तरीही सत्तास्थापनेचा पेच अद्याप कायम आहे. अशातच येत्या पाच डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पाच तारखेला केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल.
  • विधानसभा निवडणुकीत मविआचे पानीपत झाल्यानंतर राज्यात महायुतीचीच सत्ता येणार हे स्पष्ट झाले आहे. आता सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे.
  • शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळातील गटनेतेपदी एकनाथ शिंदेची, तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजितदादा पवार यांची निवड केली. मात्र विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने अद्याप विधीमंडळ गटनेता निवडलेला नाही.
  • भाजप गटनेत्याची निवड झाल्यानंतर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. दरम्यान, भाजपचा विधिमंडळ गटनेता निवडीसाठी चार डिसेंबरला मुंबईत बैठक होणार आहे. यासाठी भाजपने निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांची निरीक्षक म्हणून निवड केली आहे. उद्या सायंकाळपर्यंत पक्षाचे निरीक्षक मुंबईत पोहोचणार असल्याचे वृत्त आहे. त्यानंतर चार तारखेला भाजप आमदारांची बैठक होऊन विधीमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाईल.
  • विधीमंडळ गटनेत्याची निवड झाल्यानंतर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल. पाच तारखेला केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचे वृत्त आहे.

Related Articles

Back to top button