महाराष्ट्र
लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये यंदा मिळणार नाहीत?

- विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेमुळे महायुतीला हे यश मिळाले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या योजना राबवण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. तसेच आता निकालानंतर सरकारकडून पैसे मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान भाजपमधील वरिष्ठ नेते व महायुतीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेबाबत एक वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यावरून जाणवते की या योजनेंतर्गत महिलांना 2100 रुपये मिळण्यास विलंब होऊ शकतो.
- मुनगंटीवार यांनी नुकतीच एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, महिलांना दिली जाणारी रक्कम दीड हजार रुपयांवरून 2100 रुपये अशी वाढवली नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल. निवडणुका जिंकल्यानंतर आश्वासन पूर्ण न करणारे अशी आमची प्रतिमा देशभर पसरवली जाईल. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की, आपण आपल्या शब्दांवर ठाम राहायला हवे. जानेवारी की जुलै, कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा केली जाईल. आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना लागू केली होती. त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो, असे त्यांनी सांगितले.