महाराष्ट्र
शरद पवार गटात राजकीय भूकंप?

- विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी ‘इन्कमिंग’ने जोर धरला होता. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसपेक्षा अधिक प्रवेश पवार यांच्या राष्ट्रवादीत झाले होते. मात्र, निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुफडासाफ होताच नेत्यांनी आता सत्तेकडे वाटचाल सुरू केली असून याचीच प्रचिती आली आहे. कारण, ठाकरेंच्या एका आणि शरद पवार यांच्या दोन नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजितदादा पवार यांची भेट घेतली आहे.
- शरद पवार गटाचे नेते, माजी आमदार राहुल जगताप, शरद पवार गटाचे माजी आमदार मानसिंग नाईक आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार अपूर्व हिरे यांनी अजितदादा यांची भेट घेतली आहे. त्यामुळे तीनही नेते अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर जात असून शरद पवार आणि ठाकरेंना धक्का बसणार का? हे पाहावे लागणार आहे.
- नाईक हे शिराळ्याचे माजी आमदार आहेत. त्यांचा भाजपच्या सत्यजित देशमुख यांनी 22 हजार मतांनी विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता. परंतु, नाईक यांनीही अजितदादांनी भेट घेतली आहे. त्यामुळे नाईक हेही अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याचे सांगितले जात आहे.
- नुकत्याच विधानसभा निवडणुकीपूर्वी अजितदादांच्या राष्ट्रवादीतून ठाकरेंच्या शिवसेनेत माजी आमदार अपूर्व हिरे यांनी प्रवेश केला होता. मात्र, ते घरवापसीच्या तयारी आहेत. हिरे यांनी अजितदादांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत.