सोलापूर

ब्रेकिंग! सोलापूर जिल्ह्यात खून

सोलापूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथे सख्ख्या मुलानेच बापाचा गळा दाबून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. चंद्रकांत व्हनमाने असे हत्या झालेल्या मृत वडिलांचे नाव आहे. तर सागर व्हनमाने असे आरोपीचे नाव आहे. या हत्येप्रकरणी आरोपीला मंद्रूप पोलिसांनी अटक केली आहे. हत्येचे कारण अस्पष्ट असून पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना दुपारी साडेबारा वाजता बोळकवठे येथील गेनप्पा पुजारी यांच्या शेतात चंद्रकांत हे बेशुद्ध पडले होते. मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मृताच्या गळ्यावरील तीन ठिकाणची त्वचा निघाली होती. शवविच्छेदन केल्यानंतर चंद्रकांत यांची गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल आला. मात्र, त्याची हत्या कोणी केला हे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे मंद्रूप पोलिसांनी चंद्रकांत यांचा अज्ञाताने गळा दाबून खून केल्याचा गुन्हा दाखल केला होता. पण, तपास करताना चंद्रकांत यांची हत्या त्यांच्याच मुलाने केली असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी सागर व्हनमानेला अटक केली आहे.

Related Articles

Back to top button