महाराष्ट्र

ब्रेकिंग! विधानसभा निकालानंतर शरद पवारांना पहिला दणका

  • विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिला धक्का ज्येष्ठ नेते शरद पवारांना बसण्याची शक्यता आहे. एक बडा नेता अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभेपूर्वी शरद पवारांच्या पक्षात मोठी इन्कमिंग झाल्याचे पाहण्यास मिळाले होते. मात्र, विधानसभेत वार फिरले आणि महायुतीला बहुमत मिळाले. त्यानंतर आता पवारांच्या पक्षातून एक एक मोहऱ्याने तुतारी खाली ठेवण्यास सुरूवात केली आहे. त्यात पहिला नंबर पवारांच्या माजी आमदाराने लावला आहे.
  • राहुल जगताप यांनी अजितदादा यांची भेट घेतली आहे. जगताप हे आता राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. जगताप हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर जगताप हे अजितदादा गटात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
  • जगताप हे माजी आमदार आहेत. ते राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात होते. यंदा त्यांनी विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांकडे उमेदवारी मागितली होती. परंतु महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला. त्यामुळे जगताप यांनी बंडखोरी केली.
  • त्यानंतर शरद पवार पक्षाने त्यांना निलंबित केले होते. परंतु निवडणुकीत मात्र जगताप यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची 62 हजार 37 मते मिळाली आहेत. जर ते महाविकास आघाडीकडून लढले असते तर कदाचित जगतापांचा विजय झाला असता, अशी चर्चा सुरू आहे.

Related Articles

Back to top button