मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या; 30 वर्षीय नटीने घेतला खळबळजनक निर्णय

  • साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शोभिता शिवन्ना हिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. शुक्रवारी रात्री 30 वर्षीय शोबिता हैदराबाद येथील तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली. शोभिताच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
  • तिने हैदराबादच्या कोंडापूर येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शोभिता ही कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील सकलेशपूर येथील रहिवासी असून गेल्या दोन वर्षांपासून हैदराबाद येथे राहत होती. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 
  • तिने अल्पावधीच छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र ओळख तयार केली होती. 12 हून अधिक लोकप्रिय मालिकांमध्ये शोभिताने काम केलं. त्यात गालीपाता, मंगला गौरी, कोगिले या लोकप्रिय मालिकांचा समावेश आहे. शोभिताने एराडोंडाला मूरू, एटीएम, ओंडू काथे हेलवा आणि जॅकपॉट सारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला. शोभिताचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. यानंतर शोभिता हैदराबादमध्ये राहू लागली आणि याच कारणामुळे तिने तेलुगू सिनेमात काम शोधायला सुरुवात केली. तिने अनेक तेलगू सिनेमात काम केले आहे.

Related Articles

Back to top button