महाराष्ट्र
ब्रेकिंग! शरद पवारांची नवी चाल

उद्धव ठाकरे गटानंतर शरद पवार गटाकडूनही आता मुख्य प्रतोद आणि गटनेतेपदाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुख्य प्रतोदपदी आमदार रोहित पाटील तर प्रतोदपदी उत्तम जानकर यांची नियुक्ती करण्यात आली.
गटनेतेपदी आमदार जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर विधिमंडळ नेत्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.