सोलापूर ब्रेकिंग! महिला राँग साईडने बाईकवर आली आणि…
सोलापूर (प्रतिनिधी) राँग साईड दुचाकीवर आलेल्या महिलेनं एका पादचारी व्यक्तीस ठोकरलं. यानंतर महिलेसह तिघांनी त्या व्यक्तीला खाली पाडून बेदम मारहाण करून त्याच्याकडील महागडा आयफोन जबरदस्तीनं काढून घेतला. ही घटना चार हुतात्मा चौकालगत हि.ने. वाचनालय गेटसमोर शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली.
विकास बाळासाहेब उदाने (वय-३६,रा.निंबर्गी,ता. दक्षिण सोलापूर) हे हि.ने. वाचनालय जवळून शुक्रवारी सायंकाळी पायी चालत निघाले असताना समोरून राँग साईड स्कुटीवरून एक महिला वेगानं आली. स्कुटीची धडक विकास उदाने यांना बसली ते खाली जमिनीवर पडले.यानंतर वाद झाला तेव्हा या महिलेनं तसेच तिच्याबरोबर असलेल्या दोघां जणांनी विकास यांना बेदम मारहाण केली.
दगडानं तोंडावर मारून जखमी केलं. ते रक्तबंबाळ अवस्थेत असताना या महिलेसह या दोघांनी त्यांच्या खिशातील आयफोन हा काढून घेतला. असे उदाने यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. शिवाय या तिघांनी यांना सोडू नका, आपण कोण आहोत हे त्याला कळू द्या असं म्हणत दमबाजी केल्याचही म्हंटलं आहे. फौजदार चावडी पोलीसात अज्ञात महिलेसह दोघाजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी विकास उदाने यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्या तोंडावर दाताला मार लागला आहे. पुढील तपास सपोनि. जाधव हे करित आहेत.