महाराष्ट्र
अजितदादांनी निवडणूक जिंकली, पण पिक्चर अभी बाकी है!

- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडली आहे. मात्र यावेळी महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. परंतु, यावेळी महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी इव्हिएमवर संशय घेतला आहे.
- अशातच अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार युगेंद्र पवार यांनी एक पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता अजितदादांचे टेंशन वाढणार आहे.
- बारामतीमध्ये पाच टक्के ईव्हीएमची फेरमतमोजणी होणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले.
- निवडणुकीबाबत संपूर्ण महाराष्ट्रात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच राज्यामध्ये दिग्गज नेते जे अनेक दशकांपासून निवडून येत आहेत त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे आम्ही पक्षाच्या बैठकीत देखील यासंदर्भात चर्चा केली आहे. त्यानंतर आम्हाला सुप्रीम कोर्टाने पाच टक्के ईव्हीएम तपासायचा अधिकार देखील दिला आहे. त्यानुसार आता आम्ही पडताळणीसाठी अर्ज करणार आहोत, असे युगेंद्र पवार यांनी सांगितले.