महाराष्ट्र
पुन्हा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंना पुन्हा दणका?

- राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यानंतर मात्र अद्यापही मुख्यमंत्री कोण होणार व कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. एकीकडे मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा असून मुख्यमंत्री ठरण्या अगोदरच शिंदे हे मुंबईवरून आपल्या दरे गावी गेल्याने याबाबत अनेक तर्क वितर्क वर्तवली जात आहेत. ही संधी साधत विरोधकांनी देखील महायुतीसह शिंदेंवर निशाणा साधला होता.
- यावरुनच शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी आता थेट उद्धव ठाकरेंना इशारा दिला. पाटील यांनी उद्धव ठाकरेंचे आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंकडे असलेल्या वीस आमदारांपैकी दहा आमदार शिंदे गटात येण्याच्या तयारीत असल्याचा मोठा दावाही पाटलांनी केला आहे. पाटलांनी केलेल्या या दाव्यामुळे ठाकरेंच्या गटातील दहा आमदार कोण, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.