बिजनेस
ब्रेकिंग! गॅस सिलेंडर महागला
डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी आज महागाईचा दणका बसला आहे. सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या दरांचा आढावा घेत असतात. यानुसार इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. ही वाढ 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात झाली आहे. घरगुती गॅसच्या दरात मात्र कोणतीही वाढ झालेली नाही. घरगुती गॅस ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाढीव दर आजपासून लागू झाले आहेत. या गॅस सिलेंडरच्या दरात सरासरी 18 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
ही दरवाढ फक्त व्यावसायिक गॅसच्या बाबतीत झाली आहे. घरगुती गॅसचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे व्यावसायिक गॅसचा वापर करणारे हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते यांना झटका बसला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात खाद्यपदार्थांचे दर वाढू शकतात.