सोलापूर
ब्रेकिंग! प्रणिती शिंदे यांची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा, सोलापुरात नवा ट्विस्ट

सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठा दणका बसला. इतकेच नव्हे तर काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचा उमेदवार निवडून आला. तसेच सोलापूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे कमळ फुलले. वास्तविक या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील हे निवडणूक रिंगणात होते.
मात्र येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी ठाकरे गटाचा घात केला. आता यावर ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार प्रणिती शिंदे यांची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा, अशी मागणी कोळी यांनी केली आहे. तसेच सोलापूर महानगरपालिका ठाकरे गट स्वबळावर लढण्याची घोषणा ठाकरे गटाचे शहरप्रमुख अजय दासरी यांनी केली आहे. यामुळे आगामी निवडणुकीत सोलापूरच्या राजकारणात नवा ट्वीस्ट पहावयास मिळणार आहे.



