देश - विदेश

बिग ब्रेकिंग! अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. आज ग्रेटर कैलाश परिसरात केजरीवाल यांच्यावर एका पदयात्रेदरम्यान हा हल्ला झाला. मात्र या हल्ल्यामध्ये केजरीवाल यांना कोणतीही दुखापत झालेली नाही, ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. हल्लेखोराने त्यांच्या अंगावर कुठला तरी पदार्थ फेकून हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांकडून या हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. 

दरम्यान दिल्लीची विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांची पदयात्रा सुरू आहे. आज ग्रेटर कैलाश परिसरामध्ये त्यांच्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. याचदरम्यान हा हल्ला करण्यात आला आहे. एका व्यक्तीने त्यांच्या अंगावर कुठलातरी तरल पदार्थ फेकला. या हल्ल्यामध्ये केजरीवाल यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते सुरक्षित आहेत.

Related Articles

Back to top button