ईव्हीएम तर फक्त बहाणा…
राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये महायुतीचा बहुमतांनी विजय झाला असून महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. आता महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या पराभवानंतर काँग्रेसकडून ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मात्र काँग्रेसकडून करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा पराभव होणार हे स्पष्ट झाले होते.
लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताधारी महायुतीला मोठा दणका देत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले होते. याचदरम्यान काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत सर्व्हे करण्यात आला होता. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार असल्याची शक्यता होती, मात्र ती आता फोल ठरली आहे.
राज्यात महायुतीच्या घवघवीत यशामागे लाडकी बहीण योजना ही परिणामकारक ठरल्याचे दिसून आले आहे. काँग्रेसने केलल्या सर्वेनुसार लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला फायदा झाल्याचे समोर आले आहे. महाविकास आघाडीच्या एका नेत्यांने सांगितले होते की, एका बैठकीमध्ये महिलांना महिन्याला तीन हजार रुपये देणार असे सांगण्यात आले होते. मात्र महायुतीने त्या अगोदरच या योजनेची घोषणा करून राज्यातील महिलांना दीड हजार रुपये देण्यास सुरुवात केली आहे.
काँग्रेसने केलेल्या या अंतर्गत सर्वेक्षणामधून उद्धव ठाकरेंना इशारा देत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र त्या सर्व गोष्टींना आता पूर्णविराम देण्यात आला आहे. सर्वेक्षणातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून मॅजिक फिगर गाठू शकतात, असे समोर आले होते. मात्र हा सर्व्हे पुर्णपणे फोल ठरल्याचे दिसून आले आहे.