देश - विदेश

ब्रेकिंग! ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय

  • ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या धडक कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला नियोजित युरोप दौरा रद्द केला आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण काळ असल्याचे मानले जात असून या ऑपरेशनवर मोदी स्वतः बारकाईने लक्ष ठेवून होते.
  • मंगळवार-बुधवारच्या मध्यरात्री भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर मिसाईल हल्ले केले. या कारवाईत शंभरहून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. पहलगाम हल्ल्यानंतर मोदींनी दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांना कल्पनेपलीकडची शिक्षा देण्याचा इशारा दिला होता.
  • पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर भारताने केलेल्या या कारवाईनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी यांचा नॉर्वे, क्रोएशिया आणि नेदरलँड्स या तीन युरोपीय देशांचा आगामी दौरा सध्यासाठी रद्द करण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान अनेक महत्त्वाच्या द्विपक्षीय चर्चा आणि बैठका नियोजित होत्या. दौरा रद्द करण्याचे अधिकृत कारण स्पष्ट करण्यात आले नसले तरी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने निर्माण झालेली गंभीर परिस्थिती हेच प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे.

Related Articles

Back to top button