राजकीय
ब्रेकिंग! महायुतीचा सर्जिकल स्ट्राईक
- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभव झाला आहे. महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी थोरात यांच्या पराभव केला आहे.
- अमोल खताळ सायबर कॅफे चालवत होते. त्यांनी काही वेळ राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षात देखील काम केले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना विखे समर्थक मानले जातात आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना शिंदे गटाकडून ऐनवेळी तिकीट मिळाले होती. महायुतीकडून या जागेसाठी माजी खासदार सुजय विखे इच्छुक होते.
- तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील बारामती विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा पराभव केला आहे. परिवर्तन महाशक्ती स्थापन करुन मतदारांना तिसरा पर्याय देणाऱ्या प्रहारच्या बच्चू कडूंना मोठा धक्का बसला. बच्चू कडू यांचा अचलपूर मतदारसंघात 14 हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला.
- माहिम मतदारसंघातून राज ठाकरे याचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा दारुण पराभव झाला आहे. याठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत हे जायंट किलर ठरले आहेत. शिंदे गटाचे सदा सरवणकर यांचा पराभव झाला आहे. सातारा जिल्ह्यातील दक्षिण कराड मतदारसंघातून 78 वर्षीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तिसऱ्यांदा विजय मिळवता आला नाही. त्यांचा भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी पराभव केला आहे.