कोण आहेत पोलिस निरीक्षक संजय शिंदे?

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर अत्याचार करण्यात आलेल्या घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मारला गेला. या घटनेमुळे पुन्हा नवा वाद सुरू झाला आहे. विरोधकांनी पोलिसांच्या व सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत हा एन्काऊंटर जाणून बुजून खऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी शिंदेवर दोन गोळ्या झाडल्याची माहिती आहे. संजय शिंदे या पूर्वीही अनेक वादात अडकले आहे. त्यामुळे अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरबद्दलदेखील अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
पोलीस निरीक्षक संजय शिंदे हे ठाण्यातील खंडणी विरोधी पथकात कार्यरत होते. बदलापूर प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीत त्यांचा समावेश करण्यात आला होता. संजय शिंदे यांनी यापूर्वी माजी पोलिस अधिकारी व एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे.
गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक करणाऱ्या पथकाचे संजय शिंदे हे सदस्य होते.
त्यांनी यापूर्वी मुंबई पोलिसांमध्ये काम केले आहे आणि सध्या बदलापूर बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) भाग आहेत.