क्राईम

प्रेमविवाहानंतर चार महिन्यातच…

  • दोघांच्या घरच्यांच्या संमतीने त्यांनी प्रेमविवाह केला. नवविवाहितेने पतीच्या त्रासाला कंटाळून चारच महिन्याच्या आत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साक्षी विशाल साकोरे (वय-२२, रा. पाचवड केंदुर, ता. शिरुर) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.
    या प्रकरणी बाळासाहेब दगडु दौंडकर (वय-५१, रा. कन्हेरसर ता़ खेड) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी विशाल बबन साकोरे (रा. पाचवड केंदुर, ता. शिरुर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी साक्षी आणि विशाल यांचे खूप दिवसांपासून प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबाच्या सामंजस्यातून त्यांचा १० मे २०२४ रोजी विवाह सोहळा संपन्न झाला. तेव्हापासून साक्षी केंदुरमध्ये रहात होती. ती माहेरी आली तरीदेखील विशाल तिला फोनवरुन शिवीगाळ करत असे. तसेच तिला रात्रीच माहेरुन सासरी घेऊन जात होता.
    दरम्यान, विशाल याच्या त्रासाला कंटाळून साक्षी हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 
  • ही घटना आज सकाळी उघड झाली. त्यानंतर विशालने सकाळी ९ वाजता साक्षीच्या आईला फोन करुन साक्षी हिने गळफास घेतल्याचे आणि तिचा मृत्यु झाल्याचे न सांगता केवळ केंदुरच्या घरी या, असे बोलून फोन कट केला. साक्षी हिच्यावर अंत्यसंस्काराच्या वेळी तिचा पती किंवा तिच्या सासरचे कोणीही उपस्थित नव्हते. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.

Related Articles

Back to top button