राजकीय
ब्रेकिंग! मला मुख्यमंत्री करा, अजितदादांची अमित शहांकडे मोठी मागणी

- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासमोर एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर आलेली आहे. मुंबई विमानतळावर काल शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांची बैठक पार पडली. यात अजितदादांनी मुख्यमंत्रीपदाची महत्त्वकांक्षा व्यक्त केली आहे.
अजितदादा यांनी बिहार पॅटर्नचा दाखला देत महायुतीने विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करावे, असे शहा यांना सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा ठोकलेल्या जागांबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
अजितदादा गटातील एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, शहा, शिंदे आणि अजितदादा यांच्यात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. भाजप 288 पैकी जवळपास 150 जागा लढवू शकते. तर अजितदादा गटाला 70 जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे. शहा यांच्यासोबत मुंबई विमानतळावर झालेल्या बैठकीत विधानसभेच्या 40 जागांबाबत चर्चा झाली.



