क्राईम

चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाने सहा गाड्या उडवल्या

भाजपचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या आलिशान ऑडी कारने नागपूरच्या रामदासपेठ परिसरात तब्बल पाच वाहनांना धडक दिली.

या प्रकरणी नागपूर सिताबर्डी पोलिसांनी चालकासह दोघांना अटक केली आहे. सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री एक वाजता ऑडी कारने तक्रारदार जितेंद्र सोनकांबळे यांच्या कारला आधी धडक दिली आणि नंतर बाईकला धडक दिली. या घटनेत बाईकवरील दोन तरुण जखमी झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, संकेत यांची कारचालक अर्जुन हावरे (वय २४) व रोनित चिंतमवार (वय २७) यांच्याकडे चालवण्यासाठी दिली होती. ही कार संकेत यांच्या नावावर असून या कारने रविवारी मध्यरात्री पाच वाहनांना धडक दिली. पोलिसांनी चालक हावरे आणि चिंतमवार यांना अटक केली आहे. ही कार जप्त करण्यात आली आहे. यावेळी गाडीवरील नंबर प्लेट गायब करण्यात आल्याचं देखील उघड झाले आहे. कार नेमकी कुणाच्या नावावर आहे ? याची माहिती घेतली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑडी कारने मानकापूर भागाकडे जाणाऱ्या पाच वाहनांना धडक दिली. येथील टी-पॉइंटवर वाहनाने पोलो कारला धडक दिली. इतर कारचालकांनी ऑडी कारचा पाठलाग करून मानकापूर पुलाजवळ अडवली. यावेळी कारमधील संकेत यांच्यासह कारमधील तिघेजण पळून गेले. कारचा चालक अर्जुन हावरे आणि आणखी एक व्यक्ती, रोनित चित्तमवार यांना पोलो कारमधून प्रवास करणाऱ्या लोकांनी त्यांचा पाठलाग करून पकडले व त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथून पुढील तपासासाठी त्यांना सिताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Related Articles

Back to top button