बिजनेस

एकच नंबर ! नवीन लूक, डिझाइनसह आयफोन १६ लाँच

  • अनेक नागरिक आयफोनच्या नव्या सिरिजच्या प्रतीक्षेत होते. त्यांची ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. आयफोनने १६ सिरिज भारतात लॉन्च केली आहे. या नव्या सिरिजमध्ये आतापर्यंतचे सर्वांत दमदार फिचर्स देण्यात आले आहे.
    कॅलिफोर्निया टेक कंपनी ॲपलने आपल्या वर्षातील सर्वात मोठ्या लॉन्च इव्हेंटमध्ये बहुप्रतिक्षेत असलेल्या आयफोन १६ मालिकेतील फोनचया नव्या मॉडेल्सचे अनावरण केले आहे. या सिरिजमध्ये आयफोन १६, आय फोन १६ प्लस, आयफोन प्रो, आणि आयफोन १६ प्रो मॅक्स या मॉडेलचा समावेश आहे. या फोनमध्ये अत्याधुनिक उपकरणे, हार्डवेअर आधारित कॅमेरा कंट्रोल बटण देण्यात आले असून यामुळे वापर करणाऱ्यांच्या फोटोग्राफीचा अनुभव भन्नाट होणार आहे. याशिवाय, ए १८ आणि आणि ए १८ प्रोसह जबरदस्त परफॉर्मन्स अपग्रेड्स देखील देण्यात आले आहेत. ॲपलने इंटेलिजेंस आधारित फीचर्समुळे आयफोन वापरण्याचा अनुभव पूर्ण बदलणार आहे.
  • ॲपलचा आयफोन १६ हा एरोस्पेस ग्रेड ॲल्युमिनियम डिझाइनसह बाजारात आणण्यात आला आहे. हा फोन ५ नव्या रंगात उपलब्ध होणार आहे. या फोनला काचेच्या सिरेमिक शील्डसह मजबूत संरक्षण देण्यात आले आहे. आय फोन १६ मध्ये ६.१ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तर आयफोन १६ प्लसमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय नवीन डिव्हाईसमध्ये ॲक्शन बटण आणि हार्डवेअर आधारित कॅमेरा कंट्रोल्स देखील देण्यात आले आहेत. ॲपलच्या इन-हाउस ६ कोर सीपीयू आणि ५ कोर जीपीयूसह ३ एनएम ए १८ चिप्ससह, त्यांना विशेष ऍपल इंटेलिजेंस फीचर देखील देण्यात आले आहेत. यामुळे गेमिंगसाठीव चांगल्या प्रकारच्या फोटो व्हिडिओसाठी याचा फायदा होणार आहे.
    भारतीय बाजारपेठेत, आयफोन १६ ची किंमत ७९,९०० रुपयांपासून सुरू होते आणि आय फोन १६ प्लसची किंमत ८९,९०० रुपयांपासून सुरू होते. या दोन्हींच्या बेस मॉडेलमध्ये १२८ जीबी स्टोरेज आहे.
    नवीन आयफोन १६ प्रो मध्ये मोठा ६.३ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. आयफोन १६ प्रो मॅक्समध्ये मोठा ६.९ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यात ग्रेड ५ टायटॅनियम बिल्डमध्ये देण्यात आला आहे. पूर्वीपेक्षा मोठ्या डिस्प्लेमध्ये सिरॅमिक शील्ड संरक्षण आहे आणि नेहमी ऑन डिस्प्लेसह १२० Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. उत्तम बॅटरी ऑप्टिमायझेशन आणि कूलिंग सिस्टमचा फायदाही देण्यात आला आहे. आयफोन १६ प्रो मॅक्समध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी आयफोन बॅटरी देण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button