मला पंतप्रधान मोदी आवडतात

अमेरिकेच्या जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमध्ये एका कार्यक्रमात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक वक्तव्य केले आहे. राहुल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मला अनेकदा सहानुभूती वाटते. तुम्हा लोकांना आश्चर्य वाटेल, पण मी मोदींचा द्वेष करत नाही. मी सकाळी उठतो आणि विचार करतो की, त्यांची मते वेगळी आहेत तर माझी मते काहीशी वेगळी आहेत. मी त्याच्याशी सहमत नाही, परंतु मी त्याचा तिरस्कार करत नाही. मला राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशा लढतीचे कोणतेही कारण दिसत नाही. मी मोदी यांना माझा शत्रू देखील मानत नाही.
दरम्यान राहुल गांधी यांच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे. राहुल पुढे म्हणाले, मी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पदयात्रे दरम्यान चाललो. या प्रवासात माझ्या मनात होते की, मी २००४ पासून राजकारणात आहे. पण नेता म्हणून मी प्रेम या शब्दाचा वापरला का नाही केला ? राजकारणात आपण राग आणि द्वेष करत असतो पण, त्याहून चांगली गोष्ट म्हणजे प्रेम. मला या प्रेमाचा राजकारणात वापर करावासा वाटला. प्रेम हे किती प्रभावी व शक्तिशाली मध्यम आहे हे तुम्ही समजू शकता. प्रेम ही प्रत्येकाला जाणवणारी गोष्ट आहे. प्रत्येकाला आपल्या कुटुंबावर, देशावर प्रेम असते. मग राजकारणात हे का होऊ शकत नाही? धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येचा पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. त्याऐवजी महात्मा गांधींचीही विचारधारा देशात होती. ही विचारसरणी सांगते की आपण राग, द्वेष आणि हिंसा स्वीकारायला तयार नाही.



