राजकीय

ब्रेकिंग! अजितदादांना कोणत्या संकटाची चाहूल?

महायुतीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. तसेच जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. कुणाला किती जागा मिळणार? कोण किती त्याग करणार? याचा निर्णय अद्याप झालेला नाही. तरीदेखील चर्चा होत असलेल्या बातम्यांनी इच्छुकांची धाकधूक नक्कीच वाढली आहे. त्यातही मैत्रीपूर्ण लढतीच्या चर्चांनी नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. महायुतीत खरंच अशा मैत्रीपूर्ण लढती होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. तशा चर्चाही आहेत. यावर आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो. अशा लढती होऊच नयेत असे माझे मत असल्याचे अजितदादा म्हणाले.
अजितदादा यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. महायुतीच्या घटकपक्षांत मैत्रीपूर्ण लढती होतील अशी चर्चा आहे, याबाबत विचारले असता अजितदादा म्हणाले, राज्यात महायुतीच्या घटक पक्षात मैत्रीपूर्ण लढती होतील, या बातमीत तथ्य नाही. मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो. 

एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत असेल तर शेजारचा म्हणेल माझ्याकडे का नाही? त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत होऊ नये, हे माझे वैयक्तिक मत आहे. मात्र अजून तरी तशी काहीच चर्चा झाली नाही. महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली की अंतिम निर्णय ते घेतील. मी फक्त माझे मत मी तुम्हाला सांगितले.

Related Articles

Back to top button