बिजनेस
ह्युंडाईची नवी कार लाँच, पेट्रोल-डिझेलसह मायलेज दमदार
- भारतीय बाजारात आज Hyundai ने मोठा धमाका करत आपली नवीन कार 2024 Hyundai Alcazar लाँच केली आहे. कंपनीने ही कार दोन इंजिन पर्यायांमध्ये लाँच केली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कारमध्ये कंपनीने 70 हून अधिक कनेक्टेड कार फीचर्स दिले आहे. याचबरोबर या कारच्या डोर फोन किंवा स्मार्टवॉचच्या माध्यमातूनदेखील लॉक, अनलॉक करण्याचा फीचर्स कंपनीने दिला आहे. तसेच बाजारात ही कार प्रेस्टिज, प्लॅटिनम आणि सिग्नेचर या चार व्हेरियंटमध्ये बाजारात लाँच करण्यात आली आहे.
2024 Hyundai Alcazar च्या फ्रंटला कंपनीच्या लोगोसह कनेक्टेड LED DRL सेटअप देण्यात आला आहे तर खालच्या बाजूला एक मोठी ग्रिल देण्यात आली, ज्याच्या दोन्ही बाजूला बॉक्सी एलईडी हेडलाइट्स आहेत. तर या कारच्या बंपरवर सिल्व्हर स्किड प्लेट देण्यात आली आहे. यात 18 इंची अलॉय व्हील्स आहेत.
2024 Hyundai Alcazar मध्ये कंपनीने ड्युअल-स्क्रीन सेटअप दिले आहे ज्यामध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 10.25-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले देण्यात आले आहे. 2024 Hyundai Alcazar मध्ये 1.5 लिटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. 1.5 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन 160 पीएस पॉवर आणि 253 एनएम टॉर्क जनरेट करते.
2024 Hyundai Alcazar च्या 1.5 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपये तर 2024 Hyundai Alcazar च्या 1.5 लीटर डिझेल इंजिन व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 15.99 लाख रुपये आहे.