राजकीय

बिग ब्रेकिंग! सगळ्यांची झोप उडाली

  • महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल उद्या जाहीर होईल. त्यानंतर सरकार स्थापनेसाठी फक्त 48 तासांचा अवधी हातात राहील. या 48 तासांत महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
  • गेल्यावेळी सत्तास्थापनेसाठी आमदारांचा गुवाहाटी दौरा गाजला होता. त्यातून धडा घेऊन आता प्रत्येक पक्ष आपले आमदार सेफ ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. या 48 तासांत महाराष्ट्रात काय-काय घडेल, याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
  • विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी केवळ 48 तासांचा कालावधी असणार आहे. या काळात सत्ता स्थापन करण्यात यश आलं नाही, तर गेल्या निवडणुकीसारखी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या निकालानंतर केवळ 48 तास असल्याने हेच दोन दिवस प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. विशेष म्हणजे मतदानानंतर जाहीर झालेल्या विविध संस्थांचे सर्व्हेवरुन महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीला समान जागा येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी चुरस वाढली आहे.
  • पोलचे गांभीर्याने घेत नसल्याचे सगळेच पक्ष सांगत असले तरी, या अंदाजांनी सगळ्यांची झोप उडवली आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीत प्रचंड चुरस होणार आहे. या निवडणुकीत अपक्षांची भूमिका ही जास्त महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपक्षांची बार्गेनिंग पाँवर वाढणार आहे. अशा परिस्थितीत अपक्षांची मनधरणी करणे, सत्तास्थापनेच्या आकड्यांची जुळवाजुळव करणे, हे सर्वच पक्षांपुढे आव्हान असणार आहे. त्यातच बच्चू कडू यांनीही तिसऱ्या आघाडीचे सरकार आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगून बाँम्ब टाकून दिल्याने चर्चा वाढल्या आहेत.

Related Articles

Back to top button