राजकीय

ब्रेकिंग! शिंदेंनीच मला गुंड बनवले

उल्हासनगर हिललाईल पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाडांवर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची घटना काल घडली होती. या गोळीबार प्रकरणावर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गणपत गायकवाडांच्या गोळीबारानंतर व्हिडिओ चित्रीकरण लगेच बाहेर कसे आले? सीसीटीव्ही फुटेज नेमके कुणी मागितले होते? असा सवाल करत ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
उद्धव आज कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी सावंतवाडीत बोलताना ठाकरेंनी उल्हासनगर गोळीबार प्रकरणावर भाष्य केले. गणपत गायकवाड यांनी जो गोळीबार केला. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण पटकन बाहेर कसे आले? ते सीसीटीव्ही फुटेज कुणी मागितले होते? असा संशयास्पद सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
तसे पाहायला गेले तर गणपत गायकवाडांच्या सीसीटीव्ही फुटेजची गरजच नव्हती. कारण त्यांनीच कबुल केलेले, मीच गोळ्या घातल्या. मी गणपत गायकवाडांची बाजू घेत नाही. पण गणपत गायकवाडाने सांगितले, हा मिंधे जर मुख्यमंत्री असेल तर या राज्यात गुंडांची पैदास होईल. मिंधेनीच मला गुंड बनवले. एक बाप म्हणून मी पिसाळलो. माझे करोडो रूपये मिधेंकडे आहे. गणपत गायकवाड तुरूंगात गेले आहेत, कारण त्यांनी गुन्हाच कबूल केला आहे. पण मिंधेंचे जे करोडो रूपये आहेत, मिंधेंमुळे याला गुंडगिरी करावी लागली, त्या माणसाला काही शिक्षा होणार आहे की नाही त्याला अटक होणार आहे की नाही. आता बघू मोदी गँरंटी कुणाला पावते. मिंधेना पावते की त्यांच्याच भाजपा नेत्याला पावते, असा सवाल देखील त्यांनी भाजपाला केला आहे.

Related Articles

Back to top button