सोलापूर
ब्रेकिंग! सोलापूर आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला

- सोलापूर शहरातील अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील टॉवेल बनवणाऱ्या कंपनीला शनिवारी मध्यरात्री आग लागली. या कारखान्यात कच्चा माल असलेल्या ठिकाणी आग लागली, त्यामुळे वेगाने आग पसरली. जवळपास आठ तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सोलापूर शहरातील सर्व अग्निशमन विभागाचे बंब या ठिकाणी आग विझवण्याचे काम करत आहेत. बचावपथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र आगीने रौद्ररुप धारण केले आहे. पाण्याचे शंभर टँकर संपले तरी आग आटोक्यात आलेली नाही. शनिवारी रात्री कारखान्याला आग लागली.
- या आगीत तब्बल आठ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. या कारखान्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. मात्र, कारखान्यातील आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कारखान्याला पहाटे लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. आता मृतांच्या आकड्यात वाढ झाली.
- सेंट्रल इंडस्ट्रीजचे मालक देखील कारखान्यात अडकले होते. त्यांनाही शोधण्याचे कार्य सुरु करण्यात आले. कारखान्यातील पाच जण मास्टर बेडरुममध्ये लपून बसले होते. या पाच जणांना कारखान्याच्या बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा श्वास गुदमरून आणि होरपळून जागीच मृत्यू झाला.
- सर्व आठही मृतदेह सर्व विच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले आहेत. यामध्ये पाच पुरुष, दोन महिला आणि एका बालकाचा अंत झाला आहे.



